आवाहन
भारतीय सनातन समाजात दानाचे चिरंतन महत्व होते. विघार्थी, वानप्रस्थी , संन्यासी , भिक्षुक इत्यादीचे जीवन सुचारू रूपाने चालविणे. मंदिर व तीर्थक्षेत्री धर्मशाळा व इतर समाजोपयोगी स्थानांचे निर्माण करणे त्या निर्मितीत सहयोग देणे हा समाजातील श्रीमंताचा शाश्वत भाव होता. एक सामाजिक कर्तव्य म्हणुनही त्याकडे बघितले जाते. प्रभु श्रीरामांच्या मंदिर निर्माणासाठी समस्त समाजाला सात्विक दान व सहयोग देण्याचे आवाहन याच प्राचीन पंरपरेनुसार श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र करीत आहे.
महासागरावर सेतू निर्माण करतांना लहानग्या खारी प्रमाणे या पवित्र यज्ञात, पवित्र कार्यात यथाशक्ती योगदान देऊन आपण पुण्य प्राप्त करावे.